Friday, October 30, 2009

खरेदी

 
विक्रेता हा एक निरागस छोटा मुलगा आहे म्हणून उगाच काहीही विकत घेवू नये

Thursday, October 29, 2009

लिफ्ट्मधे नीट वागा

 
लिफ्ट्मधे उगाच लहान मुलासारखे हे बटण दाब, ते बटण दाब असले चाळे करु नयेत.

Wednesday, October 28, 2009

महत्वाचे तत्व

 
जिच्यावर कायम अन्याय होतो अशा आपल्या जवळच्या व्यक्तिकडून दुसऱ्या कुणा परक्यावर अन्याय झाल्यास बिनदिक्कत आपल्या जवळच्या व्यक्तिला पाठिंबा द्यावा.
आपल्या माणसांच्या बाबतीत दर वेळेला काही योग्य-अयोग्य पाहिलेच पाहिजे असे नाही.

कठीण प्रसंगी

 
कठीण प्रसंगी शांत चित्ताने, विचार करुन वागावे.

Friday, October 23, 2009

काम

 
काम आपल्या आवडीचे असो वा नसो, आपल्याला करावयास दिले असल्यास ते मनापासून करावे.

[ज्याने माहित असूनही आपल्या नावडीचे काम दिले त्या साहेबाचे नाव लक्षात ठेवावे]

Thursday, October 22, 2009

खाणे

 
उगाच भूक नसताना खाऊ नये.

[तहान नसताना प्याले तर चालते]

आपले काम


आपले काम सोडून, केवळ सुंदर दिसते म्हणून एखाद्या मुलीचे काम करु नका.

[मुलींनो तुम्ही आपले काम सोडून हँडसम/नॉन-हँडसम मुलांची कामे केलीत तरी चालेल]

Wednesday, October 21, 2009

झोपताना घ्यावयाची काळजी


झोपताना मानेखाली दोन उश्या घेऊ नयेत

Tuesday, October 20, 2009

आवरणे


सकाळी उठल्यावर पटापटा आवरावे.

[डाराडूर झोपून दुपारीच उठला आता तुम्ही तर काही गरज नाही पटापटा आवरायची, चालू द्या नाचणीची मळणी मग]

जागरण

जास्त जागरण करु नये.

दु:स्वास


दुसऱ्याचा दु:स्वास करु नये.
[दुसरा तुमचा दु:स्वास करत असला तर त्याला तिसरा/चौथा माना]
[तरीपण अगदी दुसऱ्याचाच दु:स्वास करायचा असला तर करा पण जगाला कळू देवू नका]

वागणे


शहाण्या मुलासारखे वागावे.
[मुलींनो तुम्ही याचा अर्थ शहाण्या मुलींसारखे वागावे असा घेवू नका. शहाण्या मुलीसारखे वागलात तरी ते वेड्यासारखेच होईल म्हणून शहाण्या मुलासारखेच वागावे, हा हा हा]