Wednesday, December 23, 2009

अवतार

 
ऐपत असूनही अवतार सिनेमा न पाहिल्यास अवतारकार्य आटोपते घ्या.
*
वरच्या वाक्याचा अर्थ हा की, शक्यतो अवतार सिनेमा बघा. बघायला नाही जमलं तर राहू द्या, काही हरकत नाही, उगाच मरुबिरु नका तेवढ्यासाठी, आमच्या डोक्याला ताप व्हायचा.
स्पष्ट केलेले बरं असतं हो, पूर्वीचे उपदेश लिहीणारे स्पष्टीकरणं नाही द्यायचे आमच्यासारखी आणि मग आता भांडतात लोकं.
***

Thursday, December 17, 2009

आजारी रजा संपवा

 
डिसेंबरमधे आजारी रजा संपवा. सगळ्या संपवल्या नाहीत तरी चालेल, निम्म्या संपवा. फायरींग होत आहे म्हणून घाबरु नका.

Friday, December 11, 2009

काम

 
शुक्रवारी काम करु नका**

**(उपदेश फक्त आयटीवाल्यांना लागू)

Monday, December 7, 2009

तात्कालिक उपदेश

 
खालील चित्रपट बघणे टाळा -
२०१२
निन्जा असॅसिन
ट्विलाईट सेगा - न्यू मून

Wednesday, December 2, 2009

अतिरेक टाळा

 
अनेक संतमहात्म्यांनी सांगितले आहे तेच - कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करु नये.

[उदाहरणार्थ, ग्लिस्टरीन दात चांगले ठेवते व ते आवडते म्हणून गुळण्या करताना त्यांनी सांगितलेले प्रमाणच घ्यावे - अजून थोडे, अजून थोडे असे करत जास्त होते मग ते गिळले की दिवसभर उलट्या !]