Wednesday, February 15, 2017

राजकारणादर

राजकारणी लोकांचा आदर करायला शिका - सगळ्याच पार्ट्यांचे. चूकीचे वागतात, ना नाही - पण खूप काम करतात हो ते. वर जरा शब्द इकडचा तिकडं झाला तर लोकांच्या शिव्या. विनोद करायची तर सोयच नाही.

Thursday, February 9, 2017

टिव्ही

टिव्ही सुरू असला तर - जवळून बघू नका, चष्मा लागयची शक्यता असते.
(टिव्ही बंद असला तर नक्कीच जवळून बघा - कुठे कुठे धूळ साचली आहे ते दिसेल.)

Tuesday, February 7, 2017

से नो टू "सेवे" सी

सेवेसी शब्द शक्यतो टाळा. ते लांबून (किंवा जवळूनही) सेक्सी लिहीलयं असं वाटतं. 
निवडणूकीच्या दिवसात तर अजूनच गोंधळ - आपल्या सेवेसी तत्पर, ते मी वाचलं - आपल्या सेक्सी तत्पर. वाटल्यास सेवेसाठी म्हणा.

Wednesday, February 1, 2017

काय एकेक सामाजिक अलिखीत नियम

ॲपेरंटली, स्वयपाकघरात कुणी पाहुणे उभे/बसले असल्यास सिंकमधे विसळायला ठेवलेले भांडे* उचलून त्यातून पाणी पिवू नये.

* काही लोक फुलपात्र म्हणतात तेच ते, गोल छोटे भांडे.