Saturday, December 2, 2017
Saturday, November 11, 2017
Proximity Problem
सिंकशेजारी वॉशिंग मशीन ठेवू नये, कपडे धुवायला टाकताना एखादवेळेला माणूच मशीनमधे थुंकून सिंकमधे कपडे टाकू शकतो. मग ह्याला निरागस चूक न समजता लोक राडावतात. (रागवण्याच्या पुढची स्टेप.)
Wednesday, February 15, 2017
राजकारणादर
राजकारणी लोकांचा आदर करायला शिका - सगळ्याच पार्ट्यांचे. चूकीचे वागतात, ना नाही - पण खूप काम करतात हो ते. वर जरा शब्द इकडचा तिकडं झाला तर लोकांच्या शिव्या. विनोद करायची तर सोयच नाही.
Thursday, February 9, 2017
टिव्ही
टिव्ही सुरू असला तर - जवळून बघू नका, चष्मा लागयची शक्यता असते.
(टिव्ही बंद असला तर नक्कीच जवळून बघा - कुठे कुठे धूळ साचली आहे ते दिसेल.)
Tuesday, February 7, 2017
से नो टू "सेवे" सी
सेवेसी शब्द शक्यतो टाळा. ते लांबून (किंवा जवळूनही) सेक्सी लिहीलयं असं वाटतं.
निवडणूकीच्या दिवसात तर अजूनच गोंधळ - आपल्या सेवेसी तत्पर, ते मी वाचलं - आपल्या सेक्सी तत्पर.
वाटल्यास सेवेसाठी म्हणा.
Wednesday, February 1, 2017
काय एकेक सामाजिक अलिखीत नियम
ॲपेरंटली, स्वयपाकघरात कुणी पाहुणे उभे/बसले असल्यास सिंकमधे विसळायला ठेवलेले भांडे* उचलून त्यातून पाणी पिवू नये.
* काही लोक फुलपात्र म्हणतात तेच ते, गोल छोटे भांडे.
Subscribe to:
Posts (Atom)