Thursday, July 29, 2010

स्विस गिअर

प्रवासात स्विस गिअरची बॅकपॅक/सॅक/दप्तर वापरावे. ओझे कमी वाटते.
एवढे बोलून मी माझे उपदेशाचे दोन शब्द संपवतो.
धन्यवाद.

Wednesday, June 30, 2010

माजहरण

प्रत्येकाचे एकदिवस माजहरण होते.

कुठे परगावी जाताना चार पैसे जास्त ठेवावेत जवळ. परदेशी जात असल्यास एखादे जादाचे क्रेडीट कार्ड बरोबर ठेवावे. आम्ही शंभरदा एका कार्डवर देशीपरदेशी जावून आलो आहे अशा माजात राहू नये. 

Friday, January 1, 2010

भाजी

 
कोबी आणि वांगे यांची एकत्र भाजी करु नका.

Wednesday, December 23, 2009

अवतार

 
ऐपत असूनही अवतार सिनेमा न पाहिल्यास अवतारकार्य आटोपते घ्या.
*
वरच्या वाक्याचा अर्थ हा की, शक्यतो अवतार सिनेमा बघा. बघायला नाही जमलं तर राहू द्या, काही हरकत नाही, उगाच मरुबिरु नका तेवढ्यासाठी, आमच्या डोक्याला ताप व्हायचा.
स्पष्ट केलेले बरं असतं हो, पूर्वीचे उपदेश लिहीणारे स्पष्टीकरणं नाही द्यायचे आमच्यासारखी आणि मग आता भांडतात लोकं.
***

Thursday, December 17, 2009

आजारी रजा संपवा

 
डिसेंबरमधे आजारी रजा संपवा. सगळ्या संपवल्या नाहीत तरी चालेल, निम्म्या संपवा. फायरींग होत आहे म्हणून घाबरु नका.

Friday, December 11, 2009

काम

 
शुक्रवारी काम करु नका**

**(उपदेश फक्त आयटीवाल्यांना लागू)

Monday, December 7, 2009

तात्कालिक उपदेश

 
खालील चित्रपट बघणे टाळा -
२०१२
निन्जा असॅसिन
ट्विलाईट सेगा - न्यू मून