Monday, January 30, 2017

क्योंकी खंडूभी कभी पांडू था

जर (तुम्ही निमशहरी-निमग्रामीण वातावरणात वाढला असाल && तुम्ही नेमाडेंचे चाहते असाल && रूम घेवून कधी घराबाहेर राहिला असाल)
{
    हिंदू वाचू नका. लहानपणापासून पाहिलेल्या, ऐकलेल्या त्याच त्याच गोष्टी कादंबरी म्हणून टाकल्या राव.
}
- तरी आम्ही नेमाडेंचे भक्त बरं का !

राष्ट्रीय पक्वान्न

२६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला जिलबी खा.

Monday, January 16, 2017

गुडी-गुडी

चार-पाच वर्षांपूर्वी गाडीला हेल्मेट तसेच ठेवले तर चोरीला जायचे, हल्ली जात नाही.
नाऊ यू आस्क - उपदेश काये?
>>
आजूबाजूच्या अशा चांगल्या घटनांची नोंद घ्यावी आणि गुड-गुड म्हणावे. 
हा आहे उपदेश.

साजणा दिवाणा बहिष्कारणा

साजण आणि दिवाणा या शब्दांचा मराठी गाण्यात अथवा वाक्यात वापर करु नये. प्लीज-हो-प्लीज, असे करु नका. लय घाण वाटते ऐकायला.

*दुसर्‍या भाषेतले बाकी हवे तेवढे शब्द वापरा, माझी ना नाही, उलट प्रोत्साहन देईन मी. पण हे वरचे दोन नको हां.