माहितीपत्रक वाचा. हार्पिक, लायझॉल वगैरेवर लिहिलेली माहिती वाचा आणि त्यानुसारच त्या त्या गोष्टींचा वापर करा.
वर हा उपदेश.
खाली ही पार्श्वभूमी. (पार्श्वभूमी शब्द या परिच्छेदात जेवढा शोभून दिसतो, तेवढा आजतागायत कुठेच शोभून दिसला नसेल. कोणीही लिहलेले परिच्छेद काढा तुम्ही - पार खांडेकर, जीए किंवा श्याम मनोहर वगैरे, चॅलेंज आहे माझं, ओप्पन चॅलेंज.)
मी गेली अनेक वर्षे, संडासात हार्पिक टाकतो आणि लगेच धुतो. (माझे ढुंगण नव्हे, संडास. जनरली मी आधी शी करतो मगच संडास धुतो, रोज धुत नाही - आय मीन संडास)
आज नवीन बाटली काढली(हार्पिकची), सहज म्हणून त्याच्यावर काय लिहिले आहे ते वाचले, तर त्यात असे लिहीलेय की, हार्पिक टाकल्यावर २ मिनीटे थांबा मग धुआ (परत तोच जोक नको)
चला असे करुन बघूया असे मी म्हणालो. असे इथे केवळ लिहीत नाहिये, मी खरेच मोठया आवाजात म्हणालो.
काय सांगू मित्रांनो, (आणि झालच तर मैत्रिणींनो) - नेहमीएवढ्याच मेहनतीत संडास अशक्य स्वच्छ निघाला. You just cannot impagine. You...just...cannot...imagine. (मोहब्बतेंमधे बच्चन शाहरुखला, "सोच कैसे लिया तुमने, कैसे...सोच...लिया असे काहितरी तेच वाक्य मस्त पॉजवार म्हणतो तसे वाचा, You...just...cannot...imagine. नाही ते रायचंद वाल्या पिक्चरमधे. असुदे.)
तर मला अगदी बिफोर/अफ्टर फोटो टाकावेसे वाटत होते फेसबुकवर, पण मी शक्यतो पर्सनल गोष्टी टाकत नाही फेसबुकवर. जोक वाचायचे, व्हिडिओ बघायचे, हसायचं आपलं.
विसरला असला तर उपदेश परत - गोष्टींवरच्या सूचना वाचा. (वाचत जा किंवा वाचत चला नव्हे, नुसतं वाचा - चालताय, जाताय कुठे आणि, रहदारी मी म्हणते आहे.)