एखाद्या गोष्टीने तुम्ही उल्हसित झाला असला (एक्साईट) तर ती दुसर्याला सांगायच्या आधी शांतपणे विचार करा. शक्यतो असा विचार करा की, तुम्ही तुमचे आर्चएनिमी आहात. (म्हणजे तुम्ही सुपरमॅन असाल तर क्षणभर विचार करा की, तुम्ही लेक्स लुथर आहात.) मग परत चेक करा की - अजूनही उल्हसितल्यासारखं वाटतयं का? (Are you still excited?) जर अजूनही उल्हसित वाटलं तरंच ज्याला कुणाला तुम्ही ओरिजनली ती गोष्ट सांगायला निघाला होता त्याला ती सांगा.
कळालं ?
असे केले नाही तर पोपट व्हायची शक्यता आहे. मी किंडलवर मराठी पुस्तके बघत होतो, मराठी नावे रोमन लिपीत लिहिली होती. त्यात मला "डॉन माने" असे पुस्तक दिसले, वि. स. खांडेकरांनी लिहिलेले. मी आई भेटल्यावर अत्युल्हसितावस्थेत तिला हे सांगितले, वर म्हणालो, आयला वाटलं नव्हतं ययाती-बियाती लिहिणार्या माणसाने असले गॅंगबिंगवरपण लिहिले असेल.
तर ती म्हणाली -
मंदा, (मी मुलगा आहे, मंद मुलाच्या ऐवजी आई, मंदा म्हणाली.) त्या पुस्तकाचे नाव "दोन मने" आहे.
घरी चालतंय पण दुकानात नको. तिकडे ओफिस टिप्स च्या पोस्ट मधे उपयोगी आहे. त्या एका पोस्ट ने येणाऱ्या पिढ्यांचा उद्धार होणार आहे _/\_
ReplyDelete