Sunday, March 11, 2018

म्हणतय ऊंची वाढलीय, खरतर कापड आटलय.

म्हणतय ऊंची वाढलीय, खरतर कापड आटलय.

नेहमी समग्र विचार करायचा प्रयत्न करा. एखाद्या गोष्टीवरून आनंदी वाटण्याआधी कन्फर्म करा की आनंदी वाटण्याजोगी परिस्थिती आहे बाबा खरच. बरेचदा मनुष्य चुकीचे निष्कर्ष काढून आनंदी/दु:खी होतो.

आभारी आहे. शुक्रीया. धन्यवाद. थॅंक्स. डँके. बाकी भाषात तुमचे तुम्ही म्हणा.

Wednesday, March 7, 2018

आधी विचार मग प्रचार.

एखाद्या गोष्टीने तुम्ही उल्हसित झाला असला (एक्साईट) तर ती दुसर्‍याला सांगायच्या आधी शांतपणे विचार करा. शक्यतो असा विचार करा की, तुम्ही तुमचे आर्चएनिमी आहात. (म्हणजे तुम्ही सुपरमॅन असाल तर क्षणभर विचार करा की, तुम्ही लेक्स लुथर आहात.) मग परत चेक करा की -  अजूनही उल्हसितल्यासारखं वाटतयं का? (Are you still excited?) जर अजूनही उल्हसित वाटलं तरंच ज्याला कुणाला तुम्ही ओरिजनली ती गोष्ट सांगायला निघाला होता त्याला ती सांगा.

कळालं ? 

असे केले नाही तर पोपट व्हायची शक्यता आहे. मी किंडलवर मराठी पुस्तके बघत होतो, मराठी नावे रोमन लिपीत लिहिली होती. त्यात मला "डॉन माने" असे पुस्तक दिसले, वि. स. खांडेकरांनी लिहिलेले. मी आई भेटल्यावर अत्युल्हसितावस्थेत तिला हे सांगितले, वर म्हणालो, आयला वाटलं नव्हतं ययाती-बियाती लिहिणार्‍या माणसाने असले गॅंगबिंगवरपण लिहिले असेल. 
तर ती म्हणाली - 
मंदा, (मी मुलगा आहे, मंद मुलाच्या ऐवजी आई, मंदा म्हणाली.) त्या पुस्तकाचे नाव "दोन मने" आहे.

माहितीपत्रक वाचा.

माहितीपत्रक वाचा. हार्पिक, लायझॉल वगैरेवर लिहिलेली माहिती वाचा आणि त्यानुसारच त्या त्या गोष्टींचा वापर करा. 
वर हा उपदेश.

खाली ही पार्श्वभूमी. (पार्श्वभूमी शब्द या परिच्छेदात जेवढा शोभून दिसतो, तेवढा आजतागायत कुठेच शोभून दिसला नसेल. कोणीही लिहलेले परिच्छेद काढा तुम्ही - पार खांडेकर, जीए किंवा श्याम मनोहर वगैरे, चॅलेंज आहे माझं, ओप्पन चॅलेंज.)

मी गेली अनेक वर्षे, संडासात हार्पिक टाकतो आणि लगेच धुतो. (माझे ढुंगण नव्हे, संडास. जनरली मी आधी शी करतो मगच संडास धुतो, रोज धुत नाही - आय मीन संडास)
आज नवीन बाटली काढली(हार्पिकची), सहज म्हणून त्याच्यावर काय लिहिले आहे ते वाचले, तर त्यात असे लिहीलेय की, हार्पिक टाकल्यावर २ मिनीटे थांबा मग धुआ (परत तोच जोक नको)
चला असे करुन बघूया असे मी म्हणालो. असे इथे केवळ लिहीत नाहिये, मी खरेच मोठया आवाजात म्हणालो.
काय सांगू मित्रांनो, (आणि झालच तर मैत्रिणींनो) - नेहमीएवढ्याच मेहनतीत संडास अशक्य स्वच्छ निघाला. You just cannot impagine. You...just...cannot...imagine. (मोहब्बतेंमधे बच्चन शाहरुखला, "सोच कैसे लिया तुमने, कैसे...सोच...लिया असे काहितरी तेच वाक्य मस्त पॉजवार म्हणतो तसे वाचा, You...just...cannot...imagine. नाही ते रायचंद वाल्या पिक्चरमधे. असुदे.)
तर मला अगदी बिफोर/अफ्टर फोटो टाकावेसे वाटत होते फेसबुकवर, पण मी शक्यतो पर्सनल गोष्टी टाकत नाही फेसबुकवर. जोक वाचायचे, व्हिडिओ बघायचे, हसायचं आपलं.

विसरला असला तर उपदेश परत -  गोष्टींवरच्या सूचना वाचा. (वाचत जा किंवा वाचत चला नव्हे, नुसतं वाचा - चालताय, जाताय कुठे आणि, रहदारी मी म्हणते आहे.)

Thursday, February 22, 2018

अजून एक नियम

मोज्याने चष्म्याची काच पुसू नये. (म्हणे) - अपेरंटली, मोजा स्वच्छ असला तरी चालत नाही आणि लोकात वाईट दिसतं.
जगातील असंख्य अलिखीत नियमांपैकी हा एक नियम नव्यानेच कळाला.

Monday, December 4, 2017

असेल लव्ह तरच झव

असेल लव्ह तरच झव.

ही नवीन म्हण आहे. एखादा हुशार विद्यार्थी/नी विचारेल - पण सर उपदेश काये?

एखादी गोष्ट मनापासून करायची असेल तरच करावी. उगाच पाट्या टाकू नयेत. 

(Mutual fund investments are subject to market risk - मी माझे उपदेश आचरणात आणतोच असे नाही.)

Saturday, December 2, 2017

if पाहुणे @ home then No उसासे.

पाहुणे आले असताना सारखे उसासे टाकू नयेत.

Saturday, November 11, 2017

काय एकेक

सिंकमधे थुंकायचे नसते, बेसिनमधे थुंकायचे असते.